मराठी बातम्या  /  क्रीडा  /  pakistani boxers: धक्कादायक! कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेले दोन पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

pakistani boxers: धक्कादायक! कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेले दोन पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 11, 2022 04:59 PM IST

Pakistani Boxers Missing In Birmingham: बर्मिंगहॅन कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप ८ ऑगस्ट रोजी झाला. त्यात सुलेमान बलोच आणि नजीरुल्लाह हे दोन पाकिस्तानी मुष्टियोद्धाही होते. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर या दोन खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधला नाही. आता पाकिस्तान आणि लंडनचे अधिकारी या दोन्ही बॉक्सरचा शोध घेत आहेत.

Pakistani Boxers
Pakistani Boxers (hindustan)

बर्मिंगहॅमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सध्या खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या खेळाडूंबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानी संघ बर्मिंगहॅमहून इस्लामाबादला रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच हे दोन खेळाडू अचानक गायब झाले, अशी माहिती पाकिस्तानी संघासोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुलेमान बलोच आणि नजीरुल्लाह अशी गायब झालेल्या बॉक्सर्सची नावे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे, या वर्षी जूनमध्ये हंगेरीतून पाकिस्तानचा एक जलतरणपटूही बेपत्ता झाला होता. आजपर्यंत त्याच्याबद्दलही काहीच माहिती मिळालेली नाही.

बर्मिंगहॅन कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप ८ ऑगस्ट रोजी झाला. त्यात सुलेमान बलोच आणि नजीरुल्लाह हे दोन पाकिस्तानी मुष्टियोद्धाही होते. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर या दोन खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधला नाही. आता पाकिस्तान आणि लंडनचे अधिकारी या दोन्ही बॉक्सरचा शोध घेत आहेत.

पासपोर्टसह उर्वरित कागदपत्रे टीमकडे

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे (PBF) सचिव नासेर तांग यांनी या प्रकाराबद्दल सांगितले की, "दोन्ही बॉक्सरचे पासपोर्टसह सर्व प्रवासी कागदपत्रे बॉक्सिंग महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत." ही कागदपत्रे मानक कार्यप्रणाली (SOP) अंतर्गत ठेवण्यात आली होती. दोन्ही बॉक्सर बेपत्ता झाल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने पाकिस्तान उच्चायुक्तालय आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

बॉक्सरच्या बाबतीत ४ सदस्यीय समिती स्थापन

पाकिस्तानी संघ बर्मिंगहॅमहून इस्लामाबादला रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच हे दोन खेळाडू अचानक गायब झाले. आता याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने (POA) ४ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

दरम्यान, यावेळी पाकिस्तानने कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णांसह ८ पदके जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानला एकही पदक मिळाले नाही. पाकिस्तानने वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले.

पाकिस्तानी जलतरणपटू फैजान जूनपासून बेपत्ता

जूनपासून पाकिस्तानी जलतरणपटू फैजान अकबर हा हंगेरीतून बेपत्ता झाला आहे. फैजान फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र, फैजानने त्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नाही. बुडापेस्टला गेल्यानंतर काही तासांतच तो पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह गायब झाला. जूनपासून त्याच्याबद्दल कोणतीही माहिती  मिळालेली नाही. अवघ्या दोन महिन्यांमध्ये आता ही दुसरी घटना घडली आहे, त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

WhatsApp channel