
अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप जिंकला. मात्र, या सामन्यानंत एका महिलेला जेलची हवा खावी लागली आहे. गोलचा जल्लोष साजरा करण्यासाठी ही पूर्ण टॉपलेस झाली होती. या कारणामुळे महिलेला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या गोंझालो मॉन्टिएलने विजयी किक मारली. तेव्हा खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. यावेळी कॅमेरा खचाखच भरलेल्या प्रेक्षकांमध्ये गेला. तेव्हा कॅमेऱ्यात एक महिला फॅन पूर्ण टॉपलेस झालेली दिसली. मोठ्या स्क्रिनवरील दृष्य पाहून सर्वजण थक्क झाले. त्या महिलेच्या हातात अर्जेंटिनाची जर्सी दिसत होती.
अशा परिस्थितीत लुसेल स्टेडियममध्ये अर्जेंटिनाच्या महिला फॅनने जे कृत्य केले त्याचे तिला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
कतारमध्ये कपड्यांबद्दल विशेष नियम
फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच कतार प्रशासनाने कपड्यांबाबत इशारा दिला होता. कतारने परदेशातून येणाऱ्या फुटबॉल चाहत्यांसाठी कपड्यांचे कठोर नियम केले होते. या नियमांनुसार फिफा वर्ल्डकप पाहण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरुष दोघांनाही संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावे लागतील, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. स्त्रियांना घट्ट आणि शरीराचा भाग दिसेल असे कपडे घालू नयेत, अशा सुचना करण्यात आल्या होत्या.
तसेच, महिलांना संपूर्ण शरीर झाकणारा काळ्या रंगाचा अबाया घालणे आवश्यक आहे. विदेशी महिलांना आबाया घालण्यापासून सूट असली तरी त्यांना खांदे आणि गुडघे झाकणारे कपडे घालण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली होती. त्यांनी तसे न केल्यास आणि त्यांची ओळख सिद्ध झाल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते आणि मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, FIFA ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक सांस्कृतिक जागरूकता लेख शेअर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, "लोक त्यांच्या आवडीचे कपडे घालू शकतात. पण कतार प्रशासनाने स्पष्टपणे असेही सांगितले होते की, जर तुम्ही येथे येत असाल तर तुम्हाला आमच्या कायद्याचा आणि संस्कृतीचा आदर करावा लागेल".
संबंधित बातम्या
