
अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत करून फिफा वर्ल्डकप २०२२ जिंकला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१८ डिसेंबर) लुसेल स्टेडियमवर खेळवला गेला. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्याचा निकाला पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. यात फ्रान्सचा ४-२ ने पराभव झाला. यानंतर अर्जेंटिनाच्या संघाने आणि चाहत्यांनी तुफान जल्लोष करायला सुरुवात केली.
या जल्लोषादरम्यान एक महिला मैदानात धावत आली आणि तिने लियोनेल मेस्सीला जोरात मिठी मारली. यानंतर ती महिला नेमकी कोण आहे यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तर ती मेस्सीची आई आहे, असेही सांगण्यात आले आहे.
मात्र, फॅक्ट चेकमध्ये ती महिला मेस्सीची आई नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी ती महिला मेस्सीची आई नसून दुसरीच महिला आहे. आता ही महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मेस्सीला मिठी मारणारी महिला कोण आहे?
दरम्यान, अनेक सोशल मीडिया युझर्सनी असा दावा केला आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये मेस्सीला मिठी मारणारी महिला ही माजी फुटबॉलपटूची आई आहे. ती स्पॅनिश फुटबॉलपटू मेस्सीची जवळची मैत्रीणदेखील आहे. स्पॅनिश मीडियाने याचा खुलासा केला असन व्हायरल झालेल्या महिलेचे नाव अँटोनिया फारियास असे आहे. अँटोनिया फारियास ही अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाची शेफ आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या संघासोबत जोडल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी अर्जेंटिनाच्या संघाने कोपा (COPA) अमेरिका आणि फायनलिस्मा (Finalissima) स्पर्धा जिंकल्या. त्यावेळीदेखील अँटोनिया फारियास या अर्जेंटिना संघाच्या सेटअपचा भाग होत्या. तसेच, फरियास या विश्वचषक स्पर्धेसाठीदेखील संघासोबत कतारमध्ये पोहोचल्या होत्या. अँटोनिया फारियास या संघात खूपच लोकप्रिय आहेत.
संबंधित बातम्या
