IND Vs WI ODI Series: दोन सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना बर्बाडोस येथे खेळवला जात आहे.या सामन्यात भारताचा युवा फलंदाज मुकेश कुमारला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. याच दौऱ्यातील कसोटी मालिकेत मुकेश कुमारने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुकेश कुमारची कसोटी मालिकेतील कामगिरी उत्कृष्ट होती. यामुळे मुकेश कुमारकडून एकदिवसीय मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाते.
मुकेश कुमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पश्चिम बंगाच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय, तो रेस्ट ऑफ इंडीच्या संघासाठीही खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता त्याची वेस्ट इंडीज दौऱ्यात निवड करण्यात आली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले.
मुकेश कुमारने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २४ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ७२ डावात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, ७१ धावा देऊन तीन विकेट्स घेणे, ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी आहे. मुकेशने ३३ टी-२० सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या हंगामात मुकेश कुमारला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोन करुन दाखवले.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.