Virat Kohli Jursey : विराट कोहली फक्त १८ नंबरचीच जर्सी का घालतो? त्यानेच सांगितलं यामागचं रहस्य
Virat Kohli 18 Number Jursey : विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट त्याच्या (Virat Kohli Jursey) जर्सी क्रमांक-१८ बद्दल बोलत आहे.
Virat Kohli On His Jursey Number : IPL 2023 च्या मोसमात विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. यंदाच्या मोसमात विराट कोहली शानदार कामगिरी करत आहे . आयपीएल व्यतिरिक्त विराट कोहलीने यंदा टीम इंडियासाठीही खूप धावा केल्या आहेत. मूळचा दिल्लीचा असलेला विराट कोहलीने दीर्घकाळ टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या दरम्यान विराट कोहलीचा जर्सी क्रमांक नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. विराटने आपल्या जर्सी नंबरबाबत अनेक मोठ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. विराट कोहलीने सांगितले आहे की, जेव्हा त्याने अंडर-19 क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून तो १८ नंबरची जर्सी परिधान करत आहे.
विराट कोहली म्हणाला की, “सुरुवातीला जर्सी क्रमांक-१८ माझ्यासाठी फारसा महत्त्वाचा नव्हता... जेव्हा मी टीम इंडियाकडून अंडर-19 खेळायला सुरुवात केली तेव्हा मला ही जर्सी मिळाली, पण नंतर ही जर्सी माझ्यासाठी खास बनली. तो पुढे म्हणाला की, माझे आंतरराष्ट्रीय पदार्पण १८ तारखेला झाले. याशिवाय माझ्या वडिलांच्या आठवणी १८ तारखेशी निगडित आहेत. १८ डिसेंबर २००६ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. अशा प्रकारे, माझ्या आयुष्यातील २ सर्वात संस्मरणीय दिवस १८ शी संबंधित आहेत”.
विराट कोहली पुढे म्हणतो की १८ क्रमांकाची जर्सी घालणे ही माझ्यासाठी खास भावना आहे. मी मैदानावर १८ क्रमांकाची जर्सी घालून खेळतो. याशिवाय माझे हजारो चाहते १८ क्रमांकाची जर्सी घालून सामना पाहायला येतात, ही भावना खूप खास आहे…
मात्र, एक दिवस असा क्षण येईल, असे घडेल, असे मला वाटले नव्हते. विशेषत: जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला वाटते की देवाने मला सर्व काही दिले आहे. हे सर्व इतके सोपे नव्हते. मात्र, विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय चाहते कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
संबंधित बातम्या