आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले. आशिया चषकात निराशाजनक खेळ दाखवल्यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यावर आहे.
BCCI १५ सप्टेंबरपूर्वी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेचा विषय म्हणजे गोलंदाजांची दुखापत. भारताचे एकूण पाच प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जसप्रीत बुमराह:
जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजी युनिटचा आहे. तो पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. या दुखापतीमुळे त्याला आशिया कपमधूनही बाहेर व्हावे लागले होते. बुमराह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर राहण्याची शक्यता आहे. बुमराह टी-२० विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
हर्षल पटेल :
बरगडीच्या दुखापतीमुळे हर्षल पटेलला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. हर्षल पटेल सध्या एनसीएमध्ये आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान तो मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. हर्षल पटेल हा स्लो बॉलसह यॉर्कर टाकण्यात माहिर आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर धोकादायक ठरू शकतो.
रवींद्र जडेजा:
स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजालाही दुखापतीमुळे चालू आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. शस्त्रक्रियेनंतरही रवींद्र जडेजाचे टी-20 विश्वचषकात खेळणे कठीण मानले जात आहे.
आवेश खान:
आवेश खानला तापाशी संबंधित आजारामुळे आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधूनही बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आवेश खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातur ५० हून अधिक धावा दिल्या होत्या. पण त्याची तब्येतही भारतीय संघासाठी चिंतेचे कारण आहे.
प्रसिद्ध कृष्णा:
न्यूझीलंड-ए विरुद्धच्या सध्याच्या मालिकेसाठी प्रसिद्ध कृष्णा भारत-अ संघात आहे. पण पाठीच्या दुखापतीमुळे कृष्णाला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. कृष्णा बाहेर पडल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या