न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा; पाहा कसा असेल भारतीय संघ?
new zealand tour of india : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसह टी-ट्वेंटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
team india squad for new zealand and austrailia tour of india : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे, टी-ट्वेंटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याबाबतची घोषणा केली असून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा तर टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता दोन तगड्या टीम सोबत भारतीय संघाचे सामने होणार असल्यानं अनेक खेळाडूंचा विजयासाठी कस लागणार आहे. याशिवाय याच वर्षी विश्चचषक स्पर्धा होणार असल्यामुळं निवड समितीचं या मालिकांतील भारतीय संघाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं दोन्ही संघांविरुद्धच्या मालिकेसाठी खेळणार नाहीये.
ट्रेंडिंग न्यूज
वनडे मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंची निवड?
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी केएल राहुल आणि अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली आहे. केएस भरत आणि शाहबाझ अहमद या निवेदित खेळाडूंना त्यांच्या जागी संधी देण्यात आली आहे. त्यानंतर रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, केएस भरत, शाहबाझ अहमद, जुझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या खेळाडूंची वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी कुणाला संधी?
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी पृथ्वी शॉ, शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार या खेळाडूंचा संघ टी-ट्वेंटी मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी कुणाची निवड?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा , मोहम्मद शामी, जयदेव उनादकट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंची नाव फायनल करण्यात आली आहे.