बुमराह, केएल राहुलची सध्याची स्थिती काय? BCCI ने दिली या ५ खेळाडूंचे फिटनेस अपडेट, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बुमराह, केएल राहुलची सध्याची स्थिती काय? BCCI ने दिली या ५ खेळाडूंचे फिटनेस अपडेट, जाणून घ्या

बुमराह, केएल राहुलची सध्याची स्थिती काय? BCCI ने दिली या ५ खेळाडूंचे फिटनेस अपडेट, जाणून घ्या

Jul 21, 2023 07:29 PM IST

team india fitness update : बीसीसीआयने टीम इंडियाच्या पाच खेळाडूंचे फिटनेस अपडेट दिले आहे. बुमराह, पंत, अय्यर आणि राहुल यांची सध्याची स्थिती काय आहे हे बोर्डाने सांगितले आहे.

team india fitness update
team india fitness update

Team India Medical Update : भारताचे पाच सर्वोत्तम खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या खेळाडूंचे हेल्थ अपडेट दिले आहेत. बोर्डाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज केएल राहुल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत यांचे फिटनेस अपडेट दिले आहेत. या खेळाडूंनी पुनरागमनासाठी किती तयारी केली आहे हे बोर्डाने ट्विट करून सांगितले आहे. 

बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे फायनल स्टेजमध्ये आहेत. तर राहुल आणि अय्यर यांनी नेटमध्ये फलंदाजी सुरू केली आहे. ऋषभ पंत रिहॅब प्रक्रियेतून जात आहे.

बीसीसीआयने सांगितले ,की बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा नेटमध्ये अनेक षटके गोलंदाजी करत आहेत. हे दोन्ही गोलंदाज रिहॅब प्रक्रिया पूर्ण करून अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. हे दोन्ही गोलंदाज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे (NCA) आयोजित सराव सामने खेळणार आहेत. सराव सामन्यानंतर वैद्यकीय पथक या दोघांबाबत अंतिम निर्णय घेईल.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबतही बोर्डाने मोठी अपडेट दिला आहे. हे दोन्ही फलंदाज फिटनेस ड्रिलमधून जात आहेत. राहुल-अय्यर यांनी नेटमध्ये फलंदाजी सुरू केली आहे. या दोघांच्या प्रगतीमुळे बीसीसीआयचे वैद्यकीय पथक आनंदी आहे. आता या दोघांच्या ताकदीवर आणि कौशल्यावर काम केले जाईल. बोर्डाने ऋषभ पंतबद्दल सांगितले की, त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्याच्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या स्ट्रेंथवर आणि रनिंगवर काम केले जाणार आहे.

विशेष म्हणजे बुमराहने सप्टेंबर २०२२ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर दुखापतीमुळे तो संघात पुनरागमन करू शकला नाही. बुमराह आयपीएल 2023 मध्येही खेळला नव्हता. श्रेयस अय्यरने मार्च २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे अय्यर आयपीएल 2023 मध्येही खेळू शकला नाही.

Whats_app_banner