मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Schedule: आशिया चषकानंतर पुढं काय? वर्ल्डकपआधी टीम इंडिया १२ सामने खेळणार, पाहा शेड्यूल

Team India Schedule: आशिया चषकानंतर पुढं काय? वर्ल्डकपआधी टीम इंडिया १२ सामने खेळणार, पाहा शेड्यूल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 08, 2022 07:43 PM IST

team india cricket schedule for australia and south africa: आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. सुपर-४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेने भारतीय संघाचा पराभव केला. आता अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघाला तीन मालिका (ODI-T20) खेळायच्या आहेत. यानंतर टीम इंडिया थेट ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे.

Team India
Team India

आशिया कप २०२२ मधील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. ग्रुप स्टेजमधील दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाने सुपर-४ टप्प्यातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.

आशिया चषकातील या निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर आणि राहुल द्रविडच्या कोचिंगवर क्रीडा क्षेत्रातील दिग्गज टीका करत आहेत. भारतीय संघाला या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये T20 विश्वचषकही खेळायचे आहे. अशा परिस्थितीत हा संघ विश्वचषक कसा जिंकणार? असा सवाल चाहते विचारत आहेत.

आशिया चषकानंतर आणि टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे.

भारतीय संघाला आजपासून T20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळण्यापूर्वी आणखी १२ सामने खेळायचे आहेत. यादरम्यान संघाला फक्त १६ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे.

टीम इंडिया हे १२ सामने कसे आणि कोणाविरुद्ध खेळणार

भारतीय संघाला आज (८ सप्टेंबर) आशिया चषक स्पर्धेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघाला ११ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. २० सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. अशा परिस्थितीत बलाढ्य संघाविरुद्ध भारतीय संघाची ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

विश्वचषकापूर्वी ५ दिवसांचा ब्रेक

ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. ३ दिवसांच्या अंतरानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत या दोन मालिकेतील ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाला त्यांची योजना आणि रणनीती आजमावण्यासाठी पूर्ण वेळ मिळणार आहे. टीम इंडिया ११ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघाला ५ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे.

T20 विश्वचषकातील भारताचा पहिला पाकिस्तानविरुद्ध

याच काळात भारताला ऑस्ट्रेलियाही गाठावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारताला १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबत दोन सराव सामने खेळायचे आहेत. तर T20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडून होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक-

पहिला T20 - २० सप्टेंबर (मोहाली)

दुसरा T20I - २३ सप्टेंबर (नागपूर)

तिसरा टी-20 -२५ सप्टेंबर (हैदराबाद)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका-

पहिला T20I - २८ सप्टेंबर (त्रिवेंद्रम)

दुसरा T20I - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा T20I - ४ ऑक्टोबर (इंदूर)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-

पहिला वनडे- ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा वनडे- ९ ऑक्टोबर (रांची)

तिसरा वनडे- ११ ऑक्टोबर (दिल्ली)

सराव सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडशी भिडणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १७ ऑक्टोबर - गाबा

भारत विरुद्ध न्यूझीलंड - १९ ऑक्टोबर - गाबा

WhatsApp channel

संबंधित बातम्या