मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Axar Patel Wedding : अक्षर पटेलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 'या' ठिकाणी ४ दिवस चालणार विवाहसोहळा
Axar Patel Wedding
Axar Patel Wedding

Axar Patel Wedding : अक्षर पटेलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 'या' ठिकाणी ४ दिवस चालणार विवाहसोहळा

24 January 2023, 20:52 ISTRohit Bibhishan Jetnavare

Axar Patel wedding date : अक्षर पटेल त्याची मंगेतर मेहा पटेलसोबत २६ जानेवारीला लग्न करणार आहे. याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली आहे. २६ जानेवारी रोजी वडोदरा येथील जेड गार्डनमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

axar patel wedding : भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (२३ जानेवारी) रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. यानंतर भारतीय संघाचा आणखी एक खेळाडू याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्टार खेळाडूचे लग्न २६ जानेवारीला होणार आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, एका रिपोर्ट्सनुसार, अक्षर पटेल त्याची मंगेतर मेहा पटेलसोबत २६ जानेवारीला लग्न करणार आहे. याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली आहे. २६ जानेवारी रोजी वडोदरा येथील जेड गार्डनमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षरचा २० जानेवारी २०२२ रोजी मेहा पटेलसोबत साखरपुडा झाला होता. मेहा आणि अक्षर पटेल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. मेहा सोशल मीडिया हँडलवर अक्षरसोबत अनेक फोटो शेअर करत असते.

रिपोर्टनुसार, अक्षर आणि मेहाच्या लग्नाचे विधी ४ दिवस चालणार आहेत. यामध्ये संगीत समारंभ, हळदी कार्यक्रम आणि विवाहसोहळा यांचा समावेश आहे. तर २७ जानेवारीला अक्षरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. या लग्नाला अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मेहा पटेल कोण आहे?

मेहा पटेल ही एक प्रोफेशनल डायटीशियन आणि न्यूट्रीनिस्ट आहे. मेहा पटेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आहे. अक्षरच्या डाएट आणि फिटनेसची ती पूर्ण काळजी घेते. सोबतच मेहा पटेलने इंस्टाग्राम अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय अनेकदा ती डाेएटशी संबंधित माहिती शेअर करत असते.