Watch : महिलांच्या कबड्डी सामन्यात राडा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल भिरकावले
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Watch : महिलांच्या कबड्डी सामन्यात राडा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल भिरकावले

Watch : महिलांच्या कबड्डी सामन्यात राडा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल भिरकावले

Jan 25, 2025 01:50 PM IST

Tamil Nadu vs Bihar Kabaddi Match Fight: पंजाबमध्ये कबड्डी सामन्यादरम्यान मोठा राडा झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Watch : कबड्डी सामन्यात राडा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल भिरकावले
Watch : कबड्डी सामन्यात राडा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल भिरकावले

Tamil Nadu vs Bihar Kabaddi Athletes Clash : पंजाबमधील भटिंडा येथे शुक्रवारी एका कबड्डी सामन्यात मोठा राडा झाला. उत्तर विभागीय आंतर विद्यापीठ आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) चॅम्पियनशिप स्पर्धेत तामिळनाडू आणि बिहारच्या महिला कबड्डीपटूंमध्ये वाद झाला.

सामन्यातील रेफ्री हे बिहारच्या बाजूने असल्याचा आरोप तामिळनाडूतील मदर तेरेसा युनिव्हर्सिटीच्या खेळाडूंनी केला. यावरून हा राडा झाला. दरभंगा विद्यापीठ संघाचे खेळाडू चुकीचे खेळत होते आणि यावर रेफ्रींनी दुर्लक्ष केले, असे तामिळनाडूच्या संघाचे म्हणणे होते, यावरून वाद आणखी वाढला.

तामिळनाडू संघाने विरोध केल्यावर रेफ्रींनी एका खेळाडूला मारहाण केल्याचेचही सांगण्यात आले, ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली.

यानंतर दरभंगा विद्यापीठाच्या समर्थकांनी वादात उडी घेत वाद आणखी वाढवला आणि कबड्डी सामन्याचे रुपांतर कुस्तीच्या आखाड्या झाले. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांवर खुर्च्या आणि टेबल फेकताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये काही पुरुष देखील दिसत आहेत, ज्यांच्याबद्दल ते अधिकारी आहेत की प्रेक्षक हे स्पष्ट झाले नाही.

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आणि खेळाडूंना किरकोळ दुखापती आल्याचे सांगितले. सामन्यादरम्यान गुणांबाबत वाद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, ही एक छोटीशी घटना होती, आता सर्व काही नियंत्रणात आहे. खेळाडूंना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत आणि ते दिल्लीतच राहतील. लवकरच ते चंदीगडला रवाना होतील, असेही स्टॅलिन म्हणाले."

Whats_app_banner

संबंधित बातम्या