आई स्टेशनवर लोकांचं ओझं उचलायची, मुलीनं पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण जिंकलं, कस्तुरीची संघर्षकथा!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  आई स्टेशनवर लोकांचं ओझं उचलायची, मुलीनं पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण जिंकलं, कस्तुरीची संघर्षकथा!

आई स्टेशनवर लोकांचं ओझं उचलायची, मुलीनं पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण जिंकलं, कस्तुरीची संघर्षकथा!

Nov 30, 2024 12:52 PM IST

Kasturi Rajamurty Won Gold Medal In Wpl World Cup 2024 : चेन्नई येथील २० वर्षीय कस्तुरी राजमूर्ती हिने रशियातील नोवोसिबिर्स्क येथे पॉवरलिफ्टिंगमध्ये विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले. कस्तुरीने ४८ किलो गटात उल्लेखनीय कामगिरी केली. आर्थिक चणचण असतानाही ती तिच्या खेळात यशस्वी ठरली.

आई स्टेशनवर लोकांचं ओझं उचलायची, मुलीनं पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण जिंकलं, कस्तुरीच संघर्षकथा!
आई स्टेशनवर लोकांचं ओझं उचलायची, मुलीनं पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण जिंकलं, कस्तुरीच संघर्षकथा!

पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये भारताच्या कस्तुरी राजमुर्ती हिने इतिहास रचला. WPPL विश्वचषक स्पर्धेत २० वर्षांच्या कस्तुरी राजमुर्तीने सुवर्णपदक जिंकले आहे. ही रशियाच्या नोवोसिबिर्स्क येथे पार पडली.

कस्तुरी जेव्हा, रशियाहून सुवर्णपदक घेऊन घरी परतली, तेव्हा कुली असलेल्या तिच्या आईच्या डोळ्यांतून आनंदश्रू येत होते. यावेळी कस्तुरीही भावूक होऊन खूप रडली.

कुलीची मुलगी वजन उचलण्याच्या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन बनली

कस्तुरी राजमूर्ती हिची आई तिरुवन्नमलाई रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करायची. लहानपणी जेव्हा कस्तुरीची आई प्रवाशांचे जड सामान डोक्यावरून घेऊन जायची, तेव्हा कस्तुरीदेखील आईला मदत करण्यासाठी पुढे यायची. अनेकदा ती जड सामान डोक्यावर घेऊन स्टेशनच्या बाहेरपर्यंत जायची.

हे वजन उलण्यासाठी तिला २५-३० रूपये मिळायचे. पण हे वजन उचलण्याचा तिचा प्रवास तिला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे. ती वजन उचलण्याच्या स्पर्धेतील वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.

कस्तुरीच्या उत्तरानं सगळ्यांना रडवलं

वास्तविक, गेल्या रविवारी, कस्तुरीने ४८ किलो गटात ७५ किलो डेडलिफ्ट आणि ५५ किलो स्क्वॅट केले. कस्तुरीला इतके वजन सहज उचलण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने खूपच भावूक उत्तर दिले. हे उत्तर ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

मी डोळे मिटले तेव्हा मला माझ्या आईचा चेहरा दिसला

कस्तुरी म्हणाली, 'जेव्हा मी स्पर्धेत वजन उचलणार होते, तेव्हा मला माझ्या आईने रेल्वे स्टेशनवर त्या बॅगा उचलल्याचे चित्र डोळ्यांसमोर आले. यानंतर अचानक माझे वजन खूप हलके झाले. माझी आई माझी प्रेरणा आहे. ती सतत मेहनत करत राहते. मला आणखी पदके जिंकायची आहेत जेणेकरून ती असे जड सामान घेऊन जाणे थांबवू शकेल.

इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता

कस्तुरी म्हणाली, की मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी माझे नाव ऐकले तेव्हा मला हलके वाटले, कारण त्या दिवशी मी नुकतेच चिकन आणि पाणी सेवन केले होते. माझा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप खडतर होता.

कस्तुरी आधी फुटबॉल खेळायची

तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेय्यार या छोट्याशा शहरात वाढलेली, कस्तुरी तिच्या शालेय फुटबॉल संघासाठी स्ट्रायकर म्हणून खेळली. यात तिने प्रादेशिक विजेतेपदं जिंकली. ती चेन्नईच्या इथिराज कॉलेजकडून खेळायची. पण पुद्दुचेरीतील राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरानंतर तिचा भ्रमनिरास झाला. कारण 'सांघिक खेळ मला मानसिकदृष्ट्या थकवतो हे मला जाणवले. मी कितीही गोल केले तरी माझे कौतुक होत नव्हते, असे मला वाटायचे.

कस्तुरीने एका वर्षात ३६ जिल्हा स्पर्धेत पदके जिंकली

यानंतर कस्तुरीने २०२३ मध्ये पॉवरलिफ्टिंगची निवड केली. एक खेळ ज्याने तिला पूर्ण नियंत्रणात ठेवले. कोट्टूरपुरममधील स्थानिक प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत असताना, तिने फुटबॉल सराव, महाविद्यालयीन वर्ग आणि पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षणाचे कठोर वेळापत्रक संतुलित केले. कठोर मेहनतीने तिने वर्षभरात जिल्हा स्पर्धेत २६ पदके जिंकली.

आर्थिक अडचणींमुळे संधी गमावली

या वर्षाच्या सुरुवातीला तिने युरोपमधील स्पर्धेत भाग घेण्याची संधी गमावली. कारण तिच्याकडे व्हिसासाठी अर्ज करायला पैसे नव्हते. यानंतर तिने स्थानिक आमदाराशी संपर्क साधला. त्याने तिला २५००० हजारांची मदत केली, पण ती स्पर्धा रद्द झाली.

यानंतर तिला नोवोसिबिर्स्क स्पर्धेने दुसरी संधी दिली. भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या पाठिंब्याने तिने या संधीचा फायदा घेतला. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) कस्तुरीला तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरण (SDAT) कडून अनपेक्षितरित्या कॉल आला, ज्याने तिला ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले.

पण कस्तुरीला सर्वात आधी नोकरी हवी आहे. तिने सांगितले की, माझी आई ही एकमेव कमावती व्यक्ती आहे. माझे वडील आजारी राहतात. माझ्या बहिणी नोकऱ्या शोधत आहेत. माझे कुटुंब सुरक्षित आणि आनंदी असल्याचे जेव्हापर्यंत मला वाटत नाही, तोपर्यंत मी खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, असे कस्तुरीने म्हटले.

Whats_app_banner
विभाग