मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Schedule: वर्ल्डकपआधी टीम इंडिया खेळणार जास्तीत जास्त सराव सामने; पाहा, संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule: वर्ल्डकपआधी टीम इंडिया खेळणार जास्तीत जास्त सराव सामने; पाहा, संपूर्ण वेळापत्रक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 01:47 PM IST

team india warm up games schedule- t20 world cup 2022: हेड कोच राहुल द्रविडने टीम इंडियाची तयारी अधित मजबूत व्हावी, यासाठी जास्तीत जास्त सराव सामन्यांची मागणी केली होती. त्यामुळे टीम इंडिया ६ ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तसेच, संघ तिथे ४ सराव सामने खेळेल.

Team India Schedule world cup schedule
Team India Schedule world cup schedule

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची जिंकल्यानंतर भारतीय संघ आता त्यांच्या पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे. टी-२० विश्वचषक ही भारताची पुढील मोठी मोहीम असणार आहे. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. भारत २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या आपला पहिला सामना खेळेल. परंतु ही वर्ल्डकप मोहीम सुरू करण्यापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये काही सराव सामने खेळणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया गुरुवारी (६ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. टीम ऑस्ट्रेलिया नियोजित वेळेपेक्षा थोडी लवकर रवाना होत आहे, जेणेकरून तेथे अधिक सराव सामने खेळता येतील. याआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध फक्त २ सराव सामने खेळायचे होते. पण आता टी-२० विश्वचषकापूर्वी भारत ४ सराव सामने खेळणार असल्याचे वृत्त आहे.

भारताच्या सराव सामन्याचे वेळापत्रक

'मेन इन ब्लू' पर्थमध्ये त्यांचा कॅम्प लावणार आहेत. भारत त्याठिकाणी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध १० आणि १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दोन सराव सामने खेळतील. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन पूर्व-नियोजित सराव सामने होतील. भारत १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि १९ ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेन येथे न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळेल.

२३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

दरम्यान, वर्ल्डकपमधील मुख्य स्पर्धेत भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर २७ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ अ गटातील उपविजेत्या संघाशी भिडणार आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर भारताचा चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी होणार आहे. हा सामना अॅडलेड येथे खेळला जाईल. तर पाचव्या साखळी सामन्यात टीम इंडिया ६ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये ब गटातील विजेत्या संघाशी भिडणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या