मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, शाहीन आफ्रिदीचं पुनरागमन

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, शाहीन आफ्रिदीचं पुनरागमन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 15, 2022 11:16 PM IST

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आली असून. बाबर आझमच्या नेतृत्वातील १५ सदस्यीय संघात शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा

T20 world cup 2022 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB)ने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्याआयसीसी टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी गुरुवारी आपल्या संघाची घोषणा केली. बाबर आजमच्या नेतृत्वात पाक क्रिकेट बोर्डाने टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया चषकास मुकलेल्या जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या शान मसूदलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये पार पडलेल्या आशिया चषकात फखर जमानलाआपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्याला त्यालाविश्वचषक स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यासोबत मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी यांनाही राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. फखर जमान दुखापतग्रस्त  असल्यामुळे अंतिम १५ मध्ये स्थान देण्यात आले नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.

 

शाहीन आफ्रिदीचं पुनरागमन -

दुखापतीमुळे आशिया चषक खेळू न शकणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झालं आहे.ऑस्ट्रेलियात होणाऱ्याटी-ट्वेंटी विश्वचषकासाठी आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शान मसदूलाही स्थान देण्यात आलं आहे.

पाकिस्तानटी20 वर्ल्ड कप टीम

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार),आसिफ अली, हैदर अली,हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद,खुशदिल शाह,मोहम्मद हसनैन,मोहम्मद नवाज,मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर

राखीव : फखर जमान, मोहम्मद हारिस, शाहनवाज दहानी

 

WhatsApp channel

विभाग