मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Michael Bevan: यंदाचा टी-20 वर्ल्डकप कोण जिंकणार? ऑस्ट्रेलियन दिग्गजानं घेतलं 'या' देशाचं नाव

Michael Bevan: यंदाचा टी-20 वर्ल्डकप कोण जिंकणार? ऑस्ट्रेलियन दिग्गजानं घेतलं 'या' देशाचं नाव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 02:07 PM IST

michael bevan- T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक सुरु होण्याआधी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकेल बेवनने एक भविष्यवाणी केली आहे. बेवनने यावेळी कोणती टीम चॅम्पियन होणार हे सांगितले आहे. या स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सर्वात वरचढ ठरतील, असा विश्वास बेवनला आहे.

Michael Bevan
Michael Bevan

अवघ्या दोन आठवड्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात १६ ऑक्टोबरपासून पात्रता फेरीने होणार आहे, तर सुपर-१२ फेरीतील सामने २२ ऑक्टोबरपासून खेळवले जातील.

दरम्यान, या स्पर्धेपूर्वी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकेल बेवनने यावेळी कोणती टीम चॅम्पियन होणार हे सांगितले आहे. या स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सर्वात वरचढ ठरतील, असा विश्वास बेवनला आहे.

एका रिपोर्टनुसार, बेवन म्हणाले की, “मला भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची निवड करायला आवडेल. पण ऑस्ट्रेलियाकडे खूप चांगले खेळाडू आहेत. जेव्हा ते खेळू लागतात तेव्हा ते अतिशय प्रभावीपणे कामगिरी करतात. मला वाटते की हा संघ यावेळी विश्वचषक जिंकू शकतो”.

तसेच, श्रीलंकेचा उल्लेख करताना वेवन म्हणाला की, “गेल्या दोन-तीन महिन्यांत श्रीलंकेने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे श्रीलंकनदेखील पूर्णपणे तयार आहेत”.

भारत चार सराव सामने खेळणार

टीम ऑस्ट्रेलिया नियोजित वेळेपेक्षा थोडी लवकर रवाना होत आहे, जेणेकरून तेथे अधिक सराव सामने खेळता येतील. याआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध फक्त २ सराव सामने खेळायचे होते. पण आता टी-२० विश्वचषकापूर्वी भारत ४ सराव सामने खेळणार असल्याचे वृत्त आहे.

'मेन इन ब्लू' पर्थमध्ये त्यांचा कॅम्प लावणार आहेत. भारत त्याठिकाणी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध १० आणि १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दोन सराव सामने खेळतील. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन पूर्व-नियोजित सराव सामने होतील. भारत १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि १९ ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेन येथे न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या