मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: टीम इंडियाला धक्का.., अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा टी20 विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

T20 World Cup: टीम इंडियाला धक्का.., अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा टी20 विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 03, 2022 10:05 PM IST

भारताचा अष्टपैलू खेळाडूरविंद्रजडेजागुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आगामीटी20विश्वकप स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

रविंद्रजडेजा
रविंद्रजडेजा

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आगामी टी20 विश्वकप स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जडेजाच्या गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकत व खूप वेळ लागू शकतो. यामुळे जडेजा आशिया चषकाबरोबरच टी-२० विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. रविंद्र जडेजाला टी20 वर्ल्ड कप २०२१ नंतर दुखापतीमुळे अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. मीडिया रिपोर्टनुसार  जडेजाला डॉक्टरांनी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र जडेजाने डॉक्टरांचा सल्ला न मानते इंजेक्शन आणि टॅब्लेटद्वारे स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत जडेजा पाकिस्तान व हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळला होता. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर त्याचे दुखणे पुन्हा बळावले व तो स्पर्धेबाहेर गेला. जडेजाच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. 

जडेजाच्या दुखापतीवर NCA ची मेडीकल टीम उपचार करत आहे. त्याचे संघात कधी पुनरागमन होईल, याबाबत काहीच सांगता येत नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. 

आशिया चषक स्पर्धा सुरू असताना सुपर ४ सामन्यांपूर्वी भारतीय संघाला हा झटका बसला आहे. दरम्यान, चाचण्या केल्यानंतर जडेजाला झालेली दुखापत गंभीर असून शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे.

टी-२० विश्चचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ विजयासाठी दावेदार म्हटले जात आहे. भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा हुकुमी एक्का होता. मात्र आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे या स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे.

WhatsApp channel