मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav: सुर्यानं स्वत:लाच गिफ्ट दिली अलिशान कार, पाहा वर्षाची कमाई

Suryakumar Yadav: सुर्यानं स्वत:लाच गिफ्ट दिली अलिशान कार, पाहा वर्षाची कमाई

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 03, 2022 07:32 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतासाठी मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने स्वत:ला एक आलिशान कार भेट केली आहे. तिसऱ्या T20 मध्ये ७६ धावा केल्यानंतर त्याने इंस्टा रीलवर लक्झरी कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्याने 'डिलीव्हरीसाठी तयार' असे कॅप्शन लिहिले आहे. म्हणजेच त्याची कार आता डिलिव्हरीसाठी तयार आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत या मालिकेत सूर्यकुमारला कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपुर फायदा घेताना आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे.

तिसर्‍या T20 मध्ये रोहित रिटायर होऊन तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमारने कॅरेबियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ४४ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने केवळ तिसरा T20I जिंकलाच नाही तर मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सामनावीर ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. ज्यामध्ये एक महागडी आलिशान कार दिसत आहे. या रीलसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डिलिव्हरीसाठी तयार आहे.' हा व्हिडिओ पाहून असे दिसते की, सूर्यकुमारने एक लक्झरी कार बुक केली आहे. ज्याची डिलिव्हरी त्याला लवकरच मिळणार आहे.

सूर्याने स्वतःलाच गिफ्ट केली करोडोंची कार

ज्या कारचा व्हिडीओ सूर्यकुमारने त्याच्या इन्स्टा रीलवर शेअर केला आहे, ती पोर्शे कन्व्हर्टेबल आहे. भारतात त्या कारची किंमत १ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त आहे. सुर्याकडे आधीच BMW 5 Series 530d Sport, Range Rover Evoque, Audi A6 सारख्या लक्झरी कार आहेत. याशिवाय त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन आणि सुझुकी हायाबुसा सारख्या अल्ट्रा लक्झरी बाइक्स देखील आहेत. भारतीय लष्करात वापरले जाणारे जोंगा गाडीही त्याने या वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केली होती. त्याचा फोटोही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

<p>Suryakumar Yadav</p>
Suryakumar Yadav

सुर्याला मुंबई इंडियन्सने ८ कोटींमध्ये रिटेन केले

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव हा एका वर्षात २० कोटी रुपयांहून अधिक कमावतो. टीम इंडियाशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मनीबॉलनुसार, त्याची एकूण आयपीएलमधील कमाई २३ कोटींहून अधिक आहे. त्याला मुंबई इंडियन्सने यंदा ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. तर २०२१ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने सुर्याला ३.२० कोटी रुपये सॅलरी पे केली होती.

WhatsApp channel