मराठी बातम्या  /  क्रीडा  /  सॉरी युझी म्हणत सुर्यानं शेअर केला 'तो' फोटो, चहल झाला ट्रोल

सॉरी युझी म्हणत सुर्यानं शेअर केला 'तो' फोटो, चहल झाला ट्रोल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 13, 2022 09:00 PM IST

suryakumar yadav trolls yuzvendra chahal: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे युझीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्याने पत्नी देवीशासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये युझवेंद्र चहलची पत्नी आणि टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरही दिसत आहे.

yuzvendra chahal
yuzvendra chahal

वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यानंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यूएईला जाणार आहे.

वेस्ट इंडिज दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघातील काही खेळाडू पार्टीच्या मूडमध्ये दिसत आहेत. टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. अनेकवेळा तो आपल्या सहकारी खेळाडूंना ट्रोल करताना दिसतो. मात्र यावेळी तो स्वतः ट्रोल झाला आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे युझीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्याने पत्नी देवीशासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये युझवेंद्र चहलची पत्नी आणि टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरही दिसत आहे.

सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी श्रेयस अय्यर आणि धनश्रीला त्यांच्या घरी बोलावले होते. मात्र यावेळी चहल दिसला नाही. यावरुनच सूर्याने चहलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्टाग्रमा स्टोरीवर त्याने चौघांचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “all about last night. सॉरी युझी, आम्ही तुला मिस केले नाही”.

यानंतर आता सुर्याची ही इन्स्टास्टोरी व्हायरल झाली आहे. तसेच, यावरुन युझवेंद्र चहलला ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे तिघे १७ जुलै रोजी संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा भाग होते. इंग्लंड मालिकेनंतर हे खेळाडू ३ वनडे आणि ५ टी-20 सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला गेले होते. अय्यर आणि सूर्यकुमार या दोघांचा T20I संघात समावेश करण्यात आला होता, तर चहलला टी-२० साठी विश्रांती देण्यात आली होती.

WhatsApp channel