मराठी बातम्या  /  क्रीडा  /  गावस्कर यांच्या कमेंटमुळे पुन्हा वाद, हेटमायर मैदानात येताच म्हणाले, 'पत्नीने…'

गावस्कर यांच्या कमेंटमुळे पुन्हा वाद, हेटमायर मैदानात येताच म्हणाले, 'पत्नीने…'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 09:55 AM IST

सुनिल गावस्कर यांनी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिम्रॉन हेटमायरच्या पत्नीबद्दल कमेंट केली होती.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी क्रिकेटपटू हेटमायर याच्या पत्नीबाबत केलेल्या कमेंटमुळे वाद निर्माण झाला आहे. आता त्यांना गावस्कर यांना आयपीएलच्या कमेंट्री पॅनेलमध्यून हटवण्याची मागणी केली जात आहे. सुनिल गावस्कर यांनी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिम्रॉन हेटमायरच्या पत्नीबद्दल कमेंट केली होती. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे गावसकर यांना आता टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

आयपीएलमध्ये शुक्रवारी राजस्थानचा चेन्नईविरुद्ध सामना झाला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १५० धावा केल्या होत्या. त्यानतंर प्रत्युत्तरादाखल खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. मात्र नंतर संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिम्रॉन हेटमायर फलंदाजीसाठी मैदानावर आला. हेटमायर खेळपट्टीवर येताच गावस्कर यांनी केलेल्या कमेंटमुळे वाद निर्माण झालाय.

हेटमायरच्या पत्नीने नुकताच पहिल्या बाळाला जन्म दिला. यामुळे काही सामन्यासाठी तो राजस्थानच्या संघासाठी उपलब्ध नव्हता. मात्र, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा संघात परतला. जेव्हा तो मैदानावर उतरला तेव्हा सुनील गावस्कर कमेंट्री करत होते. तो मैदानात उतरताच ते म्हणाले की, "शिम्रॉन हेटमायरच्या पत्नीने ‘डिलिव्हर’ केलं आहे, आता हेटमायर राजस्थानसाठी 'डिलिव्हर' करेल का?"

गावस्कर यांच्या या कमेंटनंतर सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. काही चाहत्यांनी गावस्कर यांना कमेंट्री पॅनेलमधून हटवण्याची मागणी केली आहे. हेटमायरला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात फारशी फटकेबाजी करता आली नाही. तो फक्त ७ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. प्रशांत सोळंकीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. याआधी सुनील गावस्कर आय़पीएल २०२० मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे वादात अडकले होते.

WhatsApp channel

विभाग