मराठी बातम्या  /  Sports  /  Sunil Gavaskar Dance On Natu Natu Video Watch Sunil Gavaskar Dance After Team Rrr Won Historic Oscar For Naatu Naatu Ind Vs Aus 4th Test

VIDEO : 'हे' नाही पाहिलं तर मग काय पाहिलं? हेडन आणि सुनील गावस्कर 'नाटू नाटू'वर थिरकले

Sunil Gavaskar Dance on natu natu
Sunil Gavaskar Dance on natu natu
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 14, 2023 01:01 PM IST

Matthew Hayden Sunil Gavaskar Dance on natu natu Video : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंदी दिसत होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यांनी नाटू नाटू गाण्यावर डान्स करून आनंदोत्सव साजरा केला.

ind vs aus 4th test match : सोमवारची (१३ मार्च) सकाळ भारतासाठी चांगलीच आनंदाची ठरली. एकीकडे भारताला ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाले आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या WTC) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंदी दिसले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांना नाटू नाटू या ऑस्कर (natu natu oscar) विनिंग गाण्यावर डान्स करून आपला आनंदोत्सव साजरा केला.

ट्रेंडिंग न्यूज

अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या दिवशी एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला भारतीय खेळाडू मैदानात सामना खेळत होते आणि दुसरीकडे सीमारेषेबाहेर सुनील गावस्कर नाटू-नाटू गाण्यावर नाचतताना दिसले.

वास्तविक, RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला 'सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा' ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्याचवेळी 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने लघुपट डॉक्युमेंटरी प्रकारात ऑस्कर पुरस्कार पटकावला.

यानंतर पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होण्याआधी गावस्कर म्हणाले की, "हे घडले याचा मला खूप आनंद झाला. संपूर्ण RRR टीमचे अभिनंदन. ज्यांनी गाणी संगीतबद्ध केली त्यांचे अभिनंदन. कलाकार अप्रतिम होते. मी चित्रपट पाहिला. हा एक उत्तम चित्रपट होता. ते जिंकले याचा मला खूप आनंद आहे ."

चौथ्या कसोटीत काय घडलं?

चौथ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावा केल्या. उस्मान ख्वाजाने १८० आणि कॅमेरून ग्रीनने ११४ धावा केल्या. तर पहिल्या डावात अश्विनने ६ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आणि ९१ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद १७५ धावा केल्या. अशा प्रकारे सामना ड्रॉ झाला.

भारताने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली आणि दिल्लीतील दुसरी कसोटी ६ गडी राखून जिंकली. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या