मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravi Shastri: हार्दिक पांड्याशी तुलना, गावस्करांना शास्त्री गुरुजींचे उत्तर; म्हणाले, XYZ...

Ravi Shastri: हार्दिक पांड्याशी तुलना, गावस्करांना शास्त्री गुरुजींचे उत्तर; म्हणाले, XYZ...

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 17, 2022 12:37 PM IST

Ravi Shastri On Sunil Gavaskar: सुनिल गावस्कर यांनी म्हटलं होतं की, मला वाटतं हार्दिक ते करू शकतो जे रवि शास्त्रींनी १९८५ मध्ये केलं होतं.

गावस्करांनी हार्दिक पांड्याशी तुलना केल्यानंतर रवि शास्त्रींनी प्रतिक्रिया दिलीय.
गावस्करांनी हार्दिक पांड्याशी तुलना केल्यानंतर रवि शास्त्रींनी प्रतिक्रिया दिलीय.

Ravi Shastri On Sunil Gavaskar: भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामातच विजेता बनवल्यानंतर हार्दिक पांड्या आता ज्याला हात लावतोय ती सोन्याची होतेय असं म्हणल्यास वावगं ठरू नये. आशिया कपमध्येही त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली. आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये हार्दिक पांड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. हार्दिक पांड्याचं कौतुक करताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याची तुलना थेट रवि शास्त्री यांच्याशी केली. गावस्कर म्हणाले की, हा अष्टपैलू खेळाडु ह्या वर्षी भारताला टी२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

सुनिल गावस्कर यांनी म्हटलं होतं की, मला वाटतं हार्दिक ते करू शकतो जे रवि शास्त्रींनी १९८५ मध्ये केलं होतं. पूर्ण स्पर्धेत रवि शास्त्रींनी फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली होती. काही चांगले झेलही टिपले होते. हार्दिक पांड्याही असं करण्यासाठी सक्षम आहे." रवि शास्त्री यांनी १९८५ च्या वर्ल्ड कपमध्ये ५ सामन्यात ३ अर्धशतकांसह १८२ धावा केल्या होत्या. याशिवाय ८ गडी बाद करून गोलंदाजीतही कमाल केली होती.

गावस्कर यांनी हार्दिक पांड्याशी तुलना केल्यानंतर प्रतिक्रिया देताना रवि शास्त्री यांनी म्हटलं की, मी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आधीच पोस्ट केलंय की तो या प्रकारातला नंबर एकचा अष्टपैलू क्रिकेटर आहे. तुम्हाला आणखी काय हवंय. मी दोन आठवड्यापूर्वी ट्विट केलं होतं. यात वाढवायला किंवा कमी करायला आणखी काय आहे? XYZ, ते जे काही हवं ते बोलू शकतात, प्रत्येकाला त्यांचे मत व्यक्त करायचा अधिकार आहे. माझे विचार स्पष्ट आहेत जे मी काही आठवड्यापूर्वी ट्विट केलं होतं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या