पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुहास यथीराज याने इतिहास रचला आहे. सुहास एल वायने बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष सुहासने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही रौप्य पदकाची कमाई केली होती.
दरम्यान, सुवर्णपदकाचा सामना सुहास यथिराज आणि फ्रान्सच्या लुकास मजूर यांच्यात झाला. यात सुहासचा ९-२१, १३-२१ असा पराभव झाला. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे सुहास एल वाय हे IAS अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सुहासचे करताना म्हटले की, "पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सुहास यथीराजचे खूप खूप अभिनंदन. तुमचे समर्पण आणि उत्कृष्टतेने आम्हा सर्वांना प्रेरणा मिळेल. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे."
सुहास यथीराज हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते गौतम बुद्ध नगर आणि प्रयागराजचे जिल्हा अधिकारीही राहिले आहेत. सुहास एल वाय यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते एकमेव IAS अधिकारी आहेत. त्यांना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सुहास यांनी सुरुवातीला गौतम बुद्ध नगर आणि प्रयागराजमध्ये डीएम म्हणून काम केले आहे. मात्र, सध्या ते उत्तर प्रदेश सरकारच्या युवक कल्याण आणि प्रांतीय रक्षक दलाचे सचिव आणि महासंचालक पद सांभाळत आहेत. सुहाय एल वाय यांना अर्जुन पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
सुहास एल वाय यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही रौप्य पदकजिंकले होते. त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि पॅरा आशियाई गेम्समध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.