पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे आठवे पदक निश्चित झाले आहे. भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू सुहास एल वाय याने अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केले आहे. सुहास एलवा यने SL4 प्रकारातील अंतिम फेरीत भारताच्याच सुकांत कदम याचा २१-१७, २१-१२ असा पराभव केला.
अशाप्रकारे सुहास एल वायने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक फायनलमध्ये स्थान मिळवून इतिहास रचला आहे. सध्या सुहास एल वाय हे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच क्रीडा विश्वात देशाचा झेंडा फडवकत आहे.
सुहास एलवाय पदक जिंकणार हे निश्चित झाले आहे. जर सुहास एल वाय अंतिम फेरीत पराभूत झाला तर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल. त्याचवेळी सुहास एल वायविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झालेला सुकांत कदम कांस्यपदकासाठी झुंजणार आहे.
आता अशा प्रकारे सुहास एलवाय आणि सुकांत कदम भारताच्या झोळीत २ पदके टाकू शकतात. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ७ पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये अवनी लेखरा हिने सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. याशिवाय भारताच्या ४ खेळाडूंनी कांस्यपदकावर कब्जा केला. दोघांनी रौप्य पदकाची कमाई केली.
सुहास एल वाय हे आयएएस अधिकारी आहेत. सुहास एल वाय याने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी SL4 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. सुहास एल वाय २००७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
गौतम बुद्ध नगर आणि प्रयागराजमध्ये त्यांनी डीएम म्हणून काम केले आहे. मात्र, सध्या ते उत्तर प्रदेश सरकारच्या युवक कल्याण आणि प्रांतीय रक्षक दलाचे सचिव आणि महासंचालक पद सांभाळत आहेत. सुहाय एल वाय यांना अर्जुन पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
सुहास एल वाय याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि पॅरा आशियाई गेम्समध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.