पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' टीमवर आयसीसीने घातली बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर (झेडसी) तात्काळ प्रभावाने बंदी घात

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर (झेडसी) तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. मंडळाच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप संपवण्याचा दिलेला शब्द पाळण्यात अपयश आल्याचे कारण देत झिम्बाब्वेवर बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी याची घोषणा केली. झिम्बाब्वेने आयसीसीच्या संविधानाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे मनोहर यांनी सांगितले. 

Video : युवीच चॅलेंज! दुखापतीनंतर पहिल्यांदाच धवनने हातात घेतली बॅट

ते म्हणाले की, एखाद्या सदस्य देशावर बंदी घालण्याचा निर्णय आम्ही सहज घेतलेला नाही. आमचा खेळ राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहावा, अशी आमची इच्छा आहे. झिम्बाब्वेत जे झाले आहे ते आयसीसीच्या संविधानाचे गंभीर उल्लंघन आहे. हीच स्थिती आम्ही कायम ठेवू शकत नाही. झिम्बाब्वेचे क्रिकेट सुरु राहावे. पण यासाठी आयसीसीच्या संविधानानुसार नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. 

धोनी १५ सदस्यीय संघात असला तरी टीम इलेव्हनमध्ये नसेल

जोपर्यंत झिम्बाब्वे क्रिकेट मंडळात सरकारचा हस्तक्षेप बंद होणार नाही, तोपर्यंत त्यांच्यावरील बंदी उठवली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नुकताच झिम्बाब्वेने आयर्लंडविरोधात वनडे आणि टी-२० मालिका खेळली होती. १४ जुलैला दोन्ही संघांमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळण्यात आला होता. आयसीसीच्या लंडन येथे आयोजित वार्षिक बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Zimbabwe Cricket suspended from ICC after breach of constitution and ICC approves concussion substitutes in international cricket