इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्धचा उपांत्य सामन्यातील पराभव अनेक क्रिकेट चाहते अजूनही विसरले नसतील. युजवेंद्र चहलची अवस्था देखील काहीशी अशीच आहे. विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर झालेला पराभव तो अजूनही विसरलेला नाही. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धोनी बाद होताच भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले होते.
रोहितचा सराव 'शून्य' खेळ, लक्ष्मण यांचा 'व्हेरीव्हेरी स्पेशल' सल्ला
विश्वचषकातील या आठवणींना युजवेंद्र चहलने उजाळा दिला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या उपांत्य सामन्यात मार्टीन गप्तिलने मोक्याच्या क्षणी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत धोनीला धावबाद केले. धोनी धावबाद होताच भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक क्रिकेट चाहत्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. युजवेंद्र चहलची अवस्थाही अगदी अशीच झाली होती.
पंत चुका करतोय, पण... गांगुलीच्या लेखणीतून
युजवेंद्र चहलने 'इंडिया टुडे माइंड रॉक्स यूथ समिट' या कार्यक्रमात विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, ' माझा हा पहिला विश्वचषक असल्याने ही स्पर्धा माझ्यासाठी खास अशीच होती. धोनी भाई (महेंद्रसिंह धोनी) बाद झाल्यानंतर मला फलंदाजीला जायचे होते. धोनी बाद झाल्यानंतर मी खूप तणावात होतो. मला अश्रू अनावर झाले होते. स्पर्धेतील हा पहिला क्षण होतो जो आम्हाला सर्वांना मैदान सोडून लवकरात लवकर हॉटेलकडे जावे वाटत होते, असेही त्याने सांगितले.