पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा

सौरव गांगुली आणि युवराज सिंग

भारतीय क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करण्याच श्रेय हे माजी कर्णधार सौरव गांगुलीचं आहे, हे कोणीही नाकारणार नाही. क्रिकेटच्या मैदानातील 'दादा' अशीही गांगुलीची खास ओळख आहे. 'दादागिरी' नावाच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गांगुली अँकरिंग करताना पाहायला मिळते. या कार्यक्रमासंदर्भात वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराने गांगुलीला दादागिरी म्हणजे काय? असा प्रश्न विचारला. यावर गांगुलीने हा एक रिअ‍ॅलिटी शो आहे चँम्प... गेल्या सात वर्षांपासून मी हा कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, असे उत्तर दिले.  

धोनीच्या लष्करी प्रशिक्षणाची इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूकडून खिल्ली 

त्यानंतर या दोघांच्या चर्चेत युवराज सिंगही सहभागी झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवीने लाराला दादागिरीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सौरव गांगुली नव्या खेळाडूंना धाकात ठेवत होता. त्यालाच दादागिरी असे म्हणतात, अशा मजेशीर शब्दांच्या आधारे युवीनं आपल्या माजी कर्णधाराच्या स्वभावावर भाष्य केले.

युवा राहुल चहरच्या यशातही धोनीचा हात 

युवराज सिंगने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नेटवेस्ट मालिकेत लॉर्डसच्या मैदानात गांगुलीने शर्ट काढून ज्या दादागिरीच्या अंदाजात आनंद व्यक्त केला होता. दादाच्या या आनंदी क्षणात युवराज सिंगच्या खेळीचा सिंहाचा वाटा होता.  

sourav ganguly twitter