पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून आपल्या खेळाडूंना मॅक्सवेलसारखा निर्णय घेणं अशक्य: युवी

युवराज सिंग

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने विद्यमान क्रिकेटर्सवर काही आरोप केले आहेत. सध्याच्या घडीला थकवा असतानाही खेळाडू विश्रांती घ्यायला मागत नाहीत, असे युवीने म्हटले आहे. संघातून जागा गमावण्याच्या भीतीने हा प्रकार सुरु असल्याचा तर्कही युवीने लावला आहे. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली संघातील हा प्रकार तोडगा निघेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.  

विराट ठरला जगभरातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू

यावेळी युवराज सिंगने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशीनुसार खेळाडूंच्या संघटनेचेही समर्थन केले. 'इंडियन क्रिकेटर्स एसोसिएशन' या नावाने क्रिकेटर्सची संघटना स्थापन करण्यात आली आहे. बऱ्याचदा खेळाडूंना खेळण्याची इच्छा नसताना खेळावे लागते. जर खेळण्यास नकार दिला तर संघातून डच्चू मिळेल, या दबावाखाली खेळाडूला मैदानात उतरावे लागते, त्यामुळे क्रिकेटर्ससाठी संघटनेची आवश्यकता होती, असे युवीने म्हटले आहे. यावेळी युवराजने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे उदाहरण दिले. मानसिक अस्वस्थतेमुळे मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन बोर्डाने त्याचे समर्थन केले.  

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

तो पुढे म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये असा प्रकार अशक्य आहे. कारण खेळाडूंना त्यांची जागा गमावण्याची भीती असते. यापार्श्वभूमीवर क्रिकेटर्स संघटना महत्त्वपूर्ण ठरेल. गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतील. खेळाडूंचे म्हणने देखील ऐकून घेतले जाईल, असेही युवराजने म्हटले आहे. क्रिकेट आणि क्रिकेटर या दोन्हीकडे पाहण्याचा प्रसासकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. पण एक यशस्वी कर्णधार प्रशासक झाल्यामुळे खेळाडूंसाठी या अधिक लाभ मिळेल.