पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिदीला सपोर्ट दिल्याने युवी-भज्जी झाले ट्रोल

आफ्रिदी-युवराज (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणून जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असून अनेक खेळाडू संकटाचा सामना करण्यासाठी मदतीसाठी धावून येत आहेत. दरम्यान युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. युवराज सिंगने पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदिच्या फाउंडेशनचे समर्थन केले आहे.  

छोट्या सरकारी गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

युवराजने ट्विटच्या माध्यमातून शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्यासंदेशामध्ये म्हटलंय की, सध्याची परिस्थिती खूपच कठीण आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अडचणीत असणाऱ्यांना मदत करायला हवी. शाहिद आफ्रिदी आणि एसएएफ संस्था अनेक गरजूंना मदत करत आहेत. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. DonateKarona.Com या साइटवर भेट देत तुम्हीही स्वेच्छेने योगदान देऊ शकता, असा संदेश युवीने दिला आहे. फिरकीपटू हरभजननेही आफ्रिदीच्या सामाजिक संस्थेचे समर्थन केले आहे. 

कोरोनाशी लढा: आर्थिक मदत करणाऱ्या कलाकारांचे पंतप्रधानांकडून कौतुक

यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी युवी-भज्जीला ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले. आफ्रिदी हा भारताचा मोठा शत्रू असल्याच्या प्रतिक्रिया देत काहींनी युवी-भज्जीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापतींचा दाखला देत लोक या दोन्ही क्रिकेटर्सवर टीका करत आहेत. ट्विटरवर #ShameOnYuviBhajji टॉप ट्रेंडही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तर काहींना हा ट्रेंडला प्रत्युतर देत या जोडगोळीच्या निर्णयाला समर्थन देत त्यांच्या पाठिशी ठाम उभे असल्याचा ट्रेंड निर्माण केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:yuvraj singh support shahid afridi foundation twitter top trend hame on yuvi bhajji after some people stand with yu j And Harbhajan shing