पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिक्सर किंग युवीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

युवराज सिंग

भारतीय संघाला २०११ चा विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सिक्सर किंग युवराज सिंगने सोमवारी आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्याने क्रिकेटला बाय-बाय केल्याचे जाहीर केले. यावेळी त्याने स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळत राहणार असल्याचेही स्पष्ट केले. २०१७ पासून भारतीय संघात स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला होता. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये युवराज सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. पण त्याला सातत्याने संधी मिळाली नव्हती. ३७ वर्षीय युवराजने ४० कसोटी सामन्यांत १ हजार ९०० धावा, ३०४ एकदिवसीय सामन्यांत ८ हजार ७०१, तर ५८  टी-२० सामन्यांत १ हजार १७७ धावा केल्या आहेत.

२००७ मध्ये टी-२० च्या पहिल्या  विश्वचषकात आणि २०११ मध्ये भारतामध्ये रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात युवराजने सिंहाचा वाटा उचलला होता. ३ ऑक्टोबर २००० मध्ये केनियाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगने १ फेब्रुवारीमध्ये  इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. तर ३० जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.  

युवीने नाकारली होती BCCI ची रिटायरमेंट मॅच ऑफर