पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युवीच्या आयुष्यातील या दोन गोष्टी तुम्ही ऐकल्यात का?

युवराज सिंग (HT Photo By Bhushan Koyande)

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचा आज ३८ वा वाढदिवस आहे. भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या युवराज सिंग क्रिकेट जगतातील एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. कर्करोगावर मात करुन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवणाऱ्या लढवय्याला क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेझ आजही कायम आहे. 

'त्या' सहा षटकारामागची कहाणी

युवराज म्हटल्यानंतर आठवते ती इंग्लंडविरुद्धची मॅच अन् स्टुअर्ड ब्रॉडला त्याने लगावलेले 6 6 6 6 6 6 षटकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा एक विक्रम आहे. या विक्रमाबद्दल एका कार्यक्रमात युवीला प्रश्न विचारण्यात आला होता. या सामन्यात तीन चेंडूवर तीन षटकार मारल्यानंतर तुझ्या मनात काय सुरु होते? यावर युवीने भन्नाट उत्तर दिले होते. मैदानात झालेल्या बाचाबाचीनंतर माझ्या डोक्यात नुसता राग भरला होता. येणाऱया प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा एवढेच माझ्या डोक्यात होते. असे युवीने सांगितले होते. 

हेजलला मनवायला साडेचारवर्ष घालवली

रितेश देशमुख- साजिद खान यांच्या 'यारों की बारात' या टॉक शोमध्ये युवीला हेजल कीच हिच्यासोबतच्या नात्यासंबंधाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही युवीने भन्नाट किस्सा सांगितला होता. मला भेटायला तयार नसणारी हेजल पहिली मुलगी होती. ती मला रिप्लाय द्यायची नाही. साडेतीन वर्षांनी तीने माझ्यासोबत कॉफी घेण्यास येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर तिला मनवायला एक वर्ष लागले, असा किस्साही त्याने शेअर केला. काही दिवसांपूर्वीच रोहित-रितिकाच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना  युवी तू रोहितकडून बायकोवर प्रेम करायला शिक, असे म्हटले होते.