पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूसह भारताचा माजी हॉकीपटू भाजपात

कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि हॉकीपटू संदीप सिंग

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक पटकविणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंग यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात या दोन दिग्गज खेळाडूंनी भाजपचा झेंडा हाती घेतला. 

भाजप प्रवेशानंतर योगेश्वर दत्त म्हणाला की, एक युवा म्हणून मला देशाची सेवा करायची आहे. यावेळी त्यांने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने प्रभावित झाल्याचे सांगितले. मोदींनी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करुन दाखवली, असा उल्लेखही त्याने केला. 

यष्टिमागची दूरदृष्टी 'फेल', तरीही शास्त्री म्हणतात पंत 'स्पेशल'

यापूर्वी त्याने हरियाणा पोलीस सेवेतून राजीनामा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. बुधवारी त्याने हरियाणा भाजपाचे प्रमुख सुभाष बराला यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. योगेश्वर दत्तने २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. २०१२ मध्ये त्याने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. या कामगिरीबद्दल त्याला २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हरियाणातील आगामी विधानसभेसाठी सोनीपत लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदार संघातून तो निवडणुकीच्या आखाड्यात उतरु शकतो.  

 'देशाला राष्ट्रीय खेळच नाही, कुस्तीला हा दर्जा मिळायला हवा'

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हरियाणा विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता  आहे. २९ सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, थावरचंद गहलोत आदींची उपस्थिती राहणार आहेत.