पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WWE 24*7 चॅम्पियनशिप : काही क्षणाचा चॅम्पियन!

ट्रुथने ३० वेळा 24*7 चॅम्पियन ठरण्याचा पराक्रम आपल्या नावे केलाय.

FOX च्या न्यू ईयर ईव विद स्टीव्ह हार्वेच्या दरम्यान मोजो राउलीने आर ट्रुथ ला पराभूत करत 24*7 चॅम्पियनशिप स्पर्धा गाजवली. मात्र काही क्षणातच या टायटलवर पुन्हा आर ट्रुथने कब्जा केला. ट्रुथने ३० वेळा 24*7 चॅम्पियन ठरण्याचा पराक्रम आपल्या नावे केलाय.  टाइम्स स्क्वायरमध्ये झालेल्या खास शोच्या दरम्यान मोजो राउलीने पहिल्यांदा 24*7 चॅम्पियनचा किताब जिंकला.

हार्दिकचा साखरपुडा अन् कॅप्टन कोहलीला आश्चर्याचा सुखद धक्का

सामन्याची रेफ्री असलेली मारिया जेव्हा ट्रुथची मुलाखत घेत होती. त्यावेळी संधी साधत राऊलीने ट्रुथला रोलअप करुन चॅम्पियनशिप टायटल हिसकावून घेतले. यावेळी इलायस देखील टाइम्स स्क्वायरच्या रिंगणात होता. त्याने मोजो राउलीला गिटारने मारले. त्याचा आर ट्रुथने फायदा उठवला. क्षणाचाही विलंब न करता मिळालेल्या संधीचं सोन करत काही क्षणातच 24*7 चॅम्पियनशिप पुन्हा आपल्याकडे घेतले. यावेळी मारियाने रेफ्रीच्या भूमिकेत होती.  

'आयपीएलपेक्षा रणजी-हजारे ट्रॉफीचे नियोजन खेळाडूंसाठी घातक'

२० मे २०१९ मध्ये झालेल्या लढतीत मिक फोलो 24*7 चॅम्पियशिप घेऊन आला होता. त्यावेळी आर ट्रुथने रॉबर्ट रूडला पराभूत करत 24*7 चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर ट्रुथ 24*7 और हार्डकोर चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला सुपरस्टार ठरला होता. ट्रुथ अनेक वेळा ही चॅम्पियनशिप गमावली आहे. पण तो पुन्हा ती आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरताना दिसतोय.