पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बजरंग पुनियाला 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर

कुस्तीपटू बजरंग पुनिया

प्रसिध्द कुस्तीपटू बजरंग पुनियाला केंद्र सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बजरंग पुनिया आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत देशाचे नाव रोशन करत असल्यामुळे त्याला  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तर याआधी केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुस्कार देऊन बजरंग पुनियाचा गौरव केला आहे.

भविष्यात अण्वस्त्रांचा वापर त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून - राजनाथ सिंह

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) या पुरस्कारासाठी बजरंग पुनिया याच्यासह कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या नावाची शिफारस केली होती. बजरंगने मागच्या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी आपल्या नावाची घोषणा न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्याने क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेऊन नाराजी जाहीर केली होती. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी

दरम्यान, १२ सदस्यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशीच बजरंग यांचे नाव निश्चित केले होते. या समितीमध्ये बाइचुंग भूटिया आणि मेरीकोम हे सहभागी आहेत. सर्वानुमते बजरंग पुनिया याचे या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. तसंच या पुरस्कारासाठी आणखी एका खेळाडूचे नाव ही समिती शनिवारी निश्चित करण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी