पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दमदार! विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय कुस्तीपटू

विनेश फोगट

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत आगामी ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली. जपानच्या मायू मुकैदाविरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे स्पर्धेतील जेतेपदाच्या शर्यतीतून तिला बाहेर पडावे लागले होते. मात्र, रेपेचेज राउंडच्या माध्यमातून तिला पदकाची संधी निर्माण झाली आहे. याच सामन्यात विजय मिळवत तिने टोकियोमध्ये २०२० मध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली. कुस्ती प्रकारातून ऑलिम्पिक कोटा मिळवणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.  

China Open 2019 : सायनाचा संघर्ष कायम,सिंधूची आगेकूच

फोगटने विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमधील रेपेचेज राउंडमधील दुसऱ्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा ८-२ असे पराभूत करत ऑलिम्पिक कोटा पक्का केला. कास्य पदकासाठी विनेश फोगट मारिया प्रेवोलाराकी विरुद्ध आखाड्यात उतरणार आहे. यापूर्वी विनेशने ५३ किलो वजनी गटात रेपेचेजच्या पहिल्या राउंडमध्ये यूलिया खावलदजी हिला ५-० असे सहज पराभूत केले होते.

PKL : एकमेकांविरुद्ध 'पंगा'घेणाऱ्या मंडळींनी मारला 'मिसळ-पाव'वर ताव

विनेश फोगटने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. पण आतापर्यंत तिला विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळवता आलेले नाही. ५३ किलो वजनी गटात तिला तगडी आव्हाने मिळाली आहेत. कांस्य पदकाच्या कमाईसह ती या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:World Wrestling Championship 2019 Vinesh Phogat seals Olympic quota qualifies for bronze medal playoff