पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विनेशने मैदान मारलं, विश्व कुस्ती स्पर्धेतील पहिलं वहिलं पदक

विनेश फोगटने अखेर पदक कमावले

World Wrestling Championship 2019: Vinesh Phogat: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील आपल्या पहिल्या पदकाची कमाई केली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटन जर्मनीच्या मारिया प्रेवोलाराकी हिला ४-१ असे नमवले. यापूर्वीच रेपेचेज राउंडमधील विजयासह तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते.  

China Open 2019 : सायनाचा संघर्ष कायम,सिंधूची आगेकूच

जपानच्या मायू मुकैदाविरुद्धच्या लढतीतील पराभवानंतर तिचे स्पर्धेतील जेतेपदाचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर रेपेचेज राउंडच्या माध्यमातून तिला स्पर्धेतील पदकाची संधी निर्माण झाली होती. या संधीचा पूरेपूर फायदा उचलत विनेश फोगटने कास्य पदाकावर शिक्कामोर्तब केला. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या विनेश फोगटचे विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेतील हे पहिले वहिले पदक आहे. 

PKL : एकमेकांविरुद्ध 'पंगा'घेणाऱ्या मंडळींनी मारला 'मिसळ-पाव'वर ताव

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: world wrestling championship 2019 vinesh phogat has won bronze medal in womens 53 kg at the world wrestling championships