पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या ढाण्या वाघानं रचला इतिहास

राहुल आवारे

कझाकिस्तानमध्ये रंगलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ६१ किलो वजनी गटात झालेल्या कांस्य पदकासाठीच्या लढतीत त्याने अमेरिकेच्या मल्लाला ११-४ असे एकहाती पराभूत केले. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदकाची कमाई करणारा तो महाराष्ट्राचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.

सुवर्ण संधी हुकली, अमित पंघलने ऐतिहासिक कामगिरसह पटकावले रौप्य

त्याच्या या पदकासह जागतिक कुस्ती स्पर्धेच्या गुण तालिकेत भारत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एका रौप्यासह ४ कांस्य पदक मिळाली आहेत. यापूर्वी दिपक पुनियाने अंतिम सामन्यात माघार घेतल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

 दिपक पुनियालाही ऑलिम्पिक तिकीट, अखेरच्या ३० सेकंदात मारली बाजी

शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात राहुल आवारेला पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुलला जार्जियाच्या बेका लोमाटड्जे याने १०-६ अशी मात दिली होती. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीवेळी पूर्वीच्या चुका टाळत राहुल आवारेनं अखेर मैदान मारले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: world wrestling championship 2019 rahul aware wins bronze after defeating tyler graff in 61kg category