पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप : मेरी कोमची पदक निश्चिती! सुवर्ण पंचची आस

मेरी कोम

भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. इथपर्यंत मजल मारून तिने ५१ किलो वजनी गटात आपले पदक निश्चित केले आहे. उपांत्य पूर्व फेरीत मेरी कोमने कोलंबियाच्या इंगोट वालेंसियाला ५-० असे पराभूत केले.  
४८ किलो वजनी गटात सहावेळा विश्वविजेतेपद पटकवण्याचा विक्रम मेरी कोमच्या नावे आहे. ५१ किलो वजनी गटात तिचे हे पहिले पदक असेल.

IND vs SA 2nd test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा

या वजनी गटात २०१४ आणि २०१८ मध्ये मेरी कोमने आशियाई स्पर्धा गाजवली होती. एवढेच नाही तर २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये याच वजनी गटात मेरी कोमने भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. शनिवारी उपांत्य फेरीत मेरी कोमसमोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या तुर्कीच्या बुसेनाज साकिरोग्यू हिचे आव्हान असणार आहे. ती युरोपीय चॅम्पियनशीपची सुवर्ण विजेती आहे. बुसेनाजने चीनी केइ जोंग्जूला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे.  

IND vs SA, 2nd Test : रोहितचा हा अनोखा विक्रम लांबणीवर!

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम हा मेरी कोमच्या नावे आहे. (महिला पुरुष दोन्ही गटात ती अव्वल आहे)  पुरूष गटात  क्यूबाच्या फेलिक्स सावोन याने सर्वाधिक सात पदके कमावली आहेत.  मेरीकोमच्या नावे आतापर्यंत ६ सुवर्ण आणि १ रौप्य पदकाची कमाई केली आहे. ५१ किलो वजनी गटात तिचे हे पहिले पदक असेल. यापूर्वी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्विकारावा लागला होता.