पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप : सुवर्ण संधी हुकली, मंजूला रौप्य

स्पर्धेतील पदार्पणात सुवर्ण कामगिरी करण्यात मंजू अपयशी ठरली

भारताची युवा महिला बॉक्सर मंजू रानीला जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ४८ किलो वजनी गटात रशियाची एकातेरिना पाल्टसेवा हिने तिला ४-१ असे पराभूत केले. परिणामी मंजूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 
स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या पाल्टसेवानेच्या बाजूने पाच पंचांनी  २९-२८, २९-२८, ३०-२७, ३०-७२, २८-२९ असा निकाल दिला.

IND vs SA : पुण्यात भारताचा एक डाव अन् १३७ धावांनी ऐतिहासिक

मंजूला सुवर्ण कामगिरी करण्यात अपयश आले असले तरी तब्बल १८ वर्षानंतर महिला बॉक्सिंग गटात पदार्पणात रौप्य पदकाची कमाई करण्याचा पराक्रम मंजूने करुन दाखवला. यापूर्वी एम सी मेरी कोमने २००१ मध्ये पदार्पणात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

WTC Point Table: 'विराट' विजयासह भारतीय संघाचे द्विशतक!

मंजूच्या रौप्य पदकासह भारताने या स्पर्धेत तीन कांस्य पदकाची कमाई केली आहे. यापूर्वी सहावेळा सुवर्ण कामगिरी करणाऱ्या मेरी कोमसह जमुना बोरा आमि लवलीना यांनी भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती.