पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमलासह कर्णधारही शेवटपर्यंत थांबला, लंकेचाही प्रवास परतीच्या दिशेने

अमला आणि फाफ ड्यू प्लेसिस

विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने कर्णधार फाफ डू प्लेसीसच्या नाबाद ९६ धावांची खेळी आणि हाशिम अमलाच्या ८० धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर  श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवण्याच्या श्रीलंकेच्या स्वप्न धूसर झाले आहे. 

करुणारत्ने! वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पाचवा फंलदाज

नाणेफेक जिंकून आफ्रिकेच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत श्रीलंकेचा डाव ४९. षटकात २०३ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेला क्विंटन डी कॉकच्या रुपात मलिंगाने पहिला धक्का दिला. सलामीवीर १५ धावा करुन परतल्यानंतर अमलाने मैदानात नांगर टाकले. कर्णधारही त्याला शेवटपर्यंत साथ दिली. अमलाने १०५ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने १०३ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९६ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  

BCCI ने शेअर केला टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचा फोटो

प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार दिमुथ करुणारत्नेला रबाडाने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. त्यानंतर कुशल परेरा आणि अविष्का प्रत्येकी ३० धावांची खेळी करुन माघारी फिरले. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मध्यफळीतील खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. कुशल मेंडी (२३), अँजेलो मॅथ्यूज (११), डी. सिल्वा (२४), मेंडीस (१८), परेरा (२१), इसुरु (१७) आणि मलिंगा ४ धावा करुन बाद झाले. लकमल ५ धावांवर नाबाद राहिला.