पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केदारला दुखापत, रायडू थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर रद्द करणार?

अंबाती रायडू आणि केदार जाधव

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेला केदार जाधव आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात एक चौकार वाचवण्याच्या नादात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याची ही दुखापत चेन्नई सुपर किंग्ज इतकीच भारतीय क्रिकेट संघासाठी चिंताग्रस्त आहे. 

आगामी विश्वचषक संघातील मध्यफळीत कमालीची स्पर्धा निर्माण झाली असताना केदारने भारतीय संघात स्थान मिळवले होते. यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांना वगळल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विश्वचषक संघ निवडीनंतर अंबाती रायडूनं  खोचक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आगामी विश्वचषक पाहण्यासाठी थ्रीडी गॉगल्स मागवला आहे, अशा आशयाचे ट्विट त्याने केले होते.

त्याच्या या ट्विटनंतर बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणे आगामी विश्वचषकात तीन राखीव खेळाडूंची नावे निश्चित केली होती.  यात ऋषभ पंत आणि अंबाती रायडू हे पहिले आणि दुसरे राखीव खेळाडू  तर सैनी हा गोलंदाजीसाठी राखीव असेल, असे बीसीसीआयने म्हटले होते. कोणी दुखापतग्रस्त झाले तर गरजेनुसार या तिघांपैकी एकाला भारतीय संघाकडून विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. जर केदार जाधवची दुखापत  गंभीर असेल आणि त्याला स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली तर पंत किंवा रायडू यापैकी एकजण त्याची जागा घेऊ शकेल.