पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाटा खेळपट्टीवरही आम्ही क्षमता सिद्ध करु : भुवनेश्वर

भुवनेश्वर कुमार

इंग्लंडच्या पाटा (फलंदाजांसाठी अनुकूल) खेळपट्टीवर सुरु होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकापूर्वी भारताचा अनुभवी जलदगती गोलंदाज भुवनेश्वरने कोणत्याही परिस्थितीत भारतीय गोलंदाज प्रभावी कामगिरी करुन दाखवण्यात सक्षम असल्याचे म्हटले आहे. भुवनेश्वर कुमार आयपीएल हंगामात फारसा प्रभावी दिसला नसला तरी तो आगामी विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

World Cup 2019 : इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पडेल, सचिनची भविष्यवाणी 


भुवनेश्वर कुमार दुसऱ्यांदा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत भारताकडून १०५ एकदिवसीय सामन्यात ११८ बळी टिपले आहेत. भुवनेश्वरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मागील विश्वषकापासून आतापर्यंतच्या चार वर्षात आपल्या गोलंदाजीतील सुधारणेवर भाष्य केले. तो म्हणाला की,  “मागील विश्वचषकानंतर आतापर्यंत मी वगवान आणि मध्यमगती (स्लोवर) चेंडूसह नकल चेंडूवर खूप मेहनत घेतली. याशिवाय मी फिटनेसवरही काम केले."

दादा म्हणतो, विराटच्या नेतृत्वाची तुलना नको!

भारताच्या गोलंदाजीची ताकदीबद्दल तो म्हणाला की, "भारतीय गोलंदाजी सर्वश्रेष्ठ आहे किंवा नाही यावर टिप्पणी करणार नाही.  स्पर्धेतील कामगिरीच ते ठरवेल. आतापर्यंत आम्ही आमच्यातील क्षमता दाखवून दिली आहे. संघातील गोलंदाज खूप मेहनत घेत आहेत. याच जोरावर आम्ही कोणत्याही खेळपट्टीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करु शकतो."