पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगव्या जर्सीत पंतचं वर्ल्ड कपमध्ये पदार्पण

ऋषभ पंत

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने युवा यष्टिरक्षक आणि तडाखेबाज फलंदाज ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत भगव्या जर्सीत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळत आहे.सलामीवीर शिखर धवनने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ऋषभ पंतला संघात सहभागी करुन घेण्यात आले होते.

ICC WC, #INDvENG Live: यजमानांसमोर विराट सेनेचे आव्हान!

अफगाणिस्तानविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळेल, अशी चर्चाही रंगली होती. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनेन संघात काहीच बदल न करता विजय शंकरला संघात कायम ठेवले होते.इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भगवी जर्सी परिधान करणे अभिमानास्पदः कोहली

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना कोहली पंतला कोणत्या स्थानावर खेळण्याची संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. चौथ्या क्रमांकावर तो खेळणे अपेक्षित आहे. डावाला सुरुवात करताना राइट-लेफ्ट कॉम्बिनेशनसाठी कोहली पंतला प्रमोशन देईल का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.