पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर!

डेव्हिड वॉर्नर

चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात एक वर्षांची शिक्षा आणि मानसिक त्रास सहन करुन ऑस्ट्रेलियाच्या संघात परतलेल्या डेव्हिड वॉर्नरला विश्वचषकापूर्वीच शाब्दिक मारा सुरु झालाय. इंग्लंडमधील बार्मी आर्मीने चेंडू कुरतडल्याच्या आठवणींना उजाळा देत वॉर्नरला बाऊन्सर मारलाय. त्यांनी अधिकृत ट्विट अकाऊंटवरुन वार्नरला लक्ष्य केलय. 

 इंग्लंड क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या  बार्मी आर्मी ग्रुपने अधिकृत अकाऊंटवरुन विश्वचषकासाठी सज्ज झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन, मिचल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर या तीन खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. यात नॅथन लायन आणि मिचेल स्टार्कला ऑस्ट्रेलियाच्या जर्सीत दाखवले आहे. तर डेव्हिड वॉर्नरच्या जर्सीवर 'ऑस्ट्रेलिया' या संघाच्या नावाऐवजी 'चीट्स' हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.  

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या घटनांना सामोर जाण्यासाठी संघ तयार असल्याचे म्हटले आहे. विश्वचषकात आम्हाला याप्रकारचा त्रास फार होणार नाही पण त्यानंतर होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेत यापेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, यासाठी आम्हाला तयार रहावे लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला तयारी   


...म्हणून सचिन-धोनीपेक्षा आफ्रिदीची विराटला पसंती

मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउनमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटीत चेंडू कुरतडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट हे त्रिकूट दोषी आढळले होते. या प्रकरणामुळे बेनक्रॉफ्टला नऊ महिने तर स्मिथ-वॉर्नर यांना एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. विश्वचषकातून ही जोडगोळी पुन्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे.