पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : स्फोटक ख्रिस गेलचा पाकविरुद्ध विक्रमी 'विस्फोट'

ख्रिस गेल

विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलने आक्रमक खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३४ चेंडूत केलेल्या ५० धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले.  पाकिस्तानकडून चौथे षटक घेऊन आलेल्या हसन अलीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग षटकार खेचत ख्रिस गेलेने विश्वचषकात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

ICC WC 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकचा मानहानीकारक पराभव

विश्वचषक स्पर्धेत त्याचे नावे आता ४० षटकारांची नोंद झाली आहे. या सामन्यापूर्वी विश्वचषकात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि गेल संयुक्तरित्या अव्वलस्थानी होते. दोघांच्या नावे ३७ षटकारांची नोंद होती. उल्लेखनीय म्हणजे यंदाचा विश्वचषक स्पर्धा  ख्रिस गेलसाठी शेवटची आहे. विश्वचषकानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

Video : बोलू पण बंबईया हिंदीत, चहलसोबत शास्त्रींच शास्त्र

यूनिवर्स बॉस नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने आंतरारष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ३१६ षटकार लगावले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. त्याच्यानंतर गेलचा नंबर लागतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल दुसऱ्या स्थानी असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१७ षटकारासह तो अव्वलस्थानी आहे.