महिला टी-२० च्या जागतिक क्रमवारीत भारताची सलामी फलंदाज शेफाली वर्मानं अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) बुधवारी महिला टी-२० ची क्रमवारी जाहीर केली. भारताची माजी कर्णधार मिताली राजनंतर टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानावर विराजमान होणारी शेफाली दुसरी फलंदाज ठरली. १६ वर्षीय शेफालीनं ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषकात दमदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय महिला संघाला चौथ्यांदा सेमीफायनल गाठण्यात तिच्या खेळीचा वाटा महत्त्वपूर्ण असाच आहे.
विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला
शेफालीने १९ स्थानांनी झेप घेत अव्वलस्थान गाठले. तिच्या नावे आता ७६१ गुण जमा झाले आहेत. न्यूझीलंडडच्या सुझी बेट्सला मागे टाकले. भारताची स्फोटक फंलदाज स्मृती मानधना विश्वचषकात आतापर्यंत नावाला साजेसा खेळ करु शकलेली नाही. या खराब कामगिरीचा तिला फटका बसला असून दोन स्थानांच्या घसरणीसह ती सहाव्या स्थानावर पोहचली असून जेमिमा रोड्रिग्ज ९ व्या स्थानावर आहे.
टी-२० विश्वचषकात शतकासह या महिला खेळाडूनं रचला अनोखा विक्रम
शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यातील पहिल्या ४ सामन्यात १६१ धावा केल्या आहेत. यातील दोन सामन्यात तिने ४७ आणि ४६ धावांची खेळी साकारली होती. दोन्ही सामन्यात अर्धशतकाने तिला हुलकावणी दिल्याचे पाहायला मिळाले. तिच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने चौथ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. ५ मार्चला भारतीय महिला इंग्लंडच्या महिलांसोबत भिडणार आहेत.
रशियन सुंदरीचा टेनिसला अलविदा!
टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचणारी शेफाली दुसरी भारतीय महिला
शेफालीने ५ महिन्यांच्या आपल्या कारकिर्दीत टी-२० तील अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये ती २० व्या स्थानावर होती. तर न्यूझीलंडची धाकड फलंदाज सुझी बेट्स पहिल्या स्थानावर विराजमान होती. शेफाली माजी कर्णधार मिताली राजनंतर अव्वलस्थानावर कब्जा करणारी दुसरी भारतीय महिला आहे.