पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Women’s T20 Challenge: दिप्तीनं वेलॉसिटीला २ धावांसाठी रडवलं

वेलॉसिटीने तीन विकेट्स आणि दोन षटके राखून सामना जिंकला

महिला टी-२० चॅलेंजमध्ये कर्णधार मिताली राजच्या वेलॉसिटी आणि स्मृती मानधनाच्या ट्रेलब्रेझर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मितालीच्या संघाने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्रेझर्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद ११२ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारी स्मृती मानधना दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरली. या सामन्यात तिने केवळ १० धावांचे योगदान दिले. हर्लीन देओलच्या ४० चेंडूतील ४३ धावा आणि सलामीवीर सुझी बेट्स (२६) आणि दिप्ती शर्मा (१६) धावा याव्यतिरिक्त ट्रेलबेझर्सच्या अन्य कोणत्याही महिला फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

या धावसंख्येचा पाठलाग करताना वेलॉसिटीला हॅली मॅथ्थूजच्या रुपात पहिला झटका बसला. ती अवघ्या ५ धावा करुन तंबूत परतली. त्यानंतर शेफाली वर्माने (३४) डॅनियल व्हिक्टोरीच्या (४६) साथीने डाव सावरला. शेफाली धावफलकावर ६३ धावा असताना तंबूत परतली. वेलॉसिटीसाठी हा दुसरा धक्का होता.

WOMEN’S T20 CHALLENGE: महिला मिनी आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक

त्यानंतर राजश्री गायकवाडने विजयाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या वेलॉसिटी संघाला १११ धावांवर डॅनियलच्या रुपात  तिसरा धक्का दिला. यावेळी मितालीच्या संघाला विजयासाठी १९ चेंडूत केवळ दोन धावांची गरज होती. डॅनियलची जागा घेण्यासाठी आलेली वेदा कृष्णमुर्ती खाते न उघडता धावबाद झाली. त्यानंतर फिरकीपटून दिप्ती शर्माने मिताली राज (१७), शिखा पांडे (०) आणि अमेलियाला (०) बाद करत चार चौंघीचा बळी घेतला. सुश्री प्रधानने १८ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत वेलॉसिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Womens T20 Challenge 2019 Trailblazers vs Velocity 2nd Match Result Velocity won by 3 wkts in IPL