पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वुमन्स टी 20 चॅलेंज फायनल : हरमनप्रीतच्या संघाची 'बल्लेबल्ले'

हरमनप्रीतने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात रंगलेल्या वुमन्स टी-२० चॅलेंजच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाने बाजी मारली आहे. शेवटपर्यंत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सुपनोवाने मिताली राजच्या नेतृत्वाखालील वेलॉसिटीच्या संघाला चार विकेट्सनी पराभूत करत आयपीएलच्या महिला टी-२० चॅलेंजचा पहिल्या चषकावर नाव कोरले. सुपरनोवाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक धावा केल्या. वेलॉसिटीने दिलेल्या १२१ धावांचा पाठलाग करताना ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिच्या व्यतिरिक्त सलामीची फलंदाज प्रिया पुनिया (२९), जेमायमा रॉड्रीग्ज (२२) आणि अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या राधा यादवने महत्त्वपूर्ण १० धावांचे योगदान दिले.       

VIDEO: धोनीचे 'चिल्लर पार्टी'सोबत सेलिब्रेशन

हरमनप्रीतने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुपरनोची गोलंदाज ताहुहु आणि अनुजा पाटीलने हरमनप्रीतचा निर्णय सार्थ ठरवत वेलॉसिटीला सुरुवातीलाच दोन धक्के देत बॅकपूटवर टाकले. ताहुहुने हॅली मॅथ्युजला तर अनुजा पाटीलने डॅनियली वॅटला खातेही न उघडू देता माघारी धाडले. त्यानंतर आक्रमक खेळ करण्याची क्षमता असलेल्या शेफाली वर्माला ताहुहुने ११ धावावर बाद करत वेलॉसिटीला संकटात आणले. आघाडी अपयशी ठरल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार मिताली राजने वेलॉसिटीचा डाव सारण्याचा प्रयत्न केला. पण, तिलाही फार काळ मैदानात थांबता आले नाही. ती अवघ्या १२ धावा करुन बाद झाली. सुष्मा वर्माच्या ४० आणि अमेलिया केर्रने केलेल्या ३६ धावांच्या जोरावर वेलॉसिटी संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Womens T20 Challenge 2019 Harmanpreet Kaur Supernovas vs Mithali Raj Velocity Final Result