पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप : मेरी कॉमसह या युवा महिलांकडून पदकाची आस

मेरी कोम

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहावेळा सुवर्ण पंच मारणाऱ्या एमसी मेरी कोम पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. आजपासून सुरु झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंगमध्ये तिच्यासह युवा महिलांच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील. ३६ वर्षीय मेरी कोमचा आतापर्यंतचा प्रवास लक्षवेधी आहे. पण ५१ किलो वजनी गटात तिने आतापर्यंत जेतेपद पटकावलेले नाही. रुसच्या रिंगमध्ये ती हा पराक्रम करुन दाखवण्यास उत्सुक असेल.  

फेडररला लागलंय बॉलिवूडचं याड, नेटकऱ्याने सुचवले हे चित्रपट

माजी चॅम्पियन एल सरिता ६० किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधीत्व करत असून तिच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ट्रायल सामन्यात तिने दमदार कामगिरी करत गतवर्षीच्या कांस्य पदक विजेत्या समिरनजीत कौरला पराभूत करुन स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले होते. 

इंडिया ओपनमध्ये सुवर्ण कामगिरी करणारी नीरज (५७ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) गटातून रिंगणात उतरणार आहेत. या दोघींमध्ये स्पर्धेत उलटफेर निकालाची नोंद करण्याची क्षमता आहे. याशिवाय ७५ किलो वजनी गटात आशियाई चॅम्पियन स्वीटी बूराच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा असतील.  २०१४ मध्ये तिने रौप्य पदक मिळवत आपल्यातील क्षमता सिद्ध केली होती.  

रोहितनं मागे टाकला सर डॉन ब्रॅडम यांचा विक्रम

भारतीय संघ  मंजू रानी (४८ किलो), एमसी मेरीकोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो), नीरज (५७ किलो), सरिता देवी (६० किलो), मंजू बोमबोरिया (६४ किलो), लवलीना बोरगोहेन (६९ किलो), स्वीटी बूरा (७५ किलो), नंदिनी (८१ किलो) आणि कविता चहल (८१ किलोपेक्षा अधिक)