पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Wisden Test team of the Decade: भारताच्या केवळ दोघांचाच समावेश

विराट कोहली

२०१९ चे वर्ष संपत असतानाच हे दशकही संपुष्टात येत आहे. सोमवारी विस्डेनने टेस्ट टीम ऑफ द डिकेडची (दशकातील कसोटी टीम) घोषणा केली आहे. या टीमच्या निवडीसाठी विस्डेन रिव्ह्यू पॅनेलमध्ये लॉरेस बूथ, जो हरमन, जॉन स्टर्न, फिल वॉकर आणि यश राणा यांचा समावेश होता. या ११ क्रिकेटपटूंमध्ये दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये तीन इंग्लंडचे, दोन ऑस्ट्रेलियाचे, दोन दक्षिण आफ्रिकेचे आणि एका श्रीलंकन खेळाडूचा समावेश आहे. विस्डेनने निवडलेल्या या कसोटी टीममध्ये एकाही पाकिस्तानी क्रिकेटपटूचा समावेश नाही. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडली दशकातील कसोटी टीम, विराट कर्णधारपदी

फलंदाजीसाठी कर्णधार विराट कोहलीचा तर फिरकीपटू म्हणून आर अश्विनला संघात स्थान मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली आहे. परंतु, एकाही भारतीय गोलंदाजाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. 

विस्डेन दशकातील कसोटी संघ
१. अ‍ॅलेस्टेर कुक (इंग्लंड)
२. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
३. कुमार संगकारा (श्रीलंका)
४. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
५. विराट कोहली (भारत)
६. बेन स्टोक्स (इंग्लंड)
७. एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका)
८. आर अश्विन (भारत)
९. डेल स्टेन (द. आफ्रिका)
१०. कगिसो रबाडा (द. आफ्रिका)
११. जेम्स अँडरसन (इंग्लंड)

पाक गोलंदाज अन् भारतीय सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:wisden releases test team of the decade virat kohli and r ashwin are the only two indians make the cut to this team steve smith david warner