पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द!

यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

कोरोना विषाणून घातलेल्या थैमानामुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या लंडनमध्ये रंगणारी ग्रँण्डस्लॅम स्पर्धा रद्द करण्याची वेळ ओढावली आहे. विम्बल्डन क्लबच्या ग्रास कोर्टवर २९ जून ते   १२ जूलै दरम्यान ही ग्रँडस्लॅमस्पर्धा खेळवण्यात येणार होती. आता ही स्पर्धा २८ जून ते ११ जूलै २० २१ मध्ये खेळवण्यात येईल.  

पीएम केअर्स फंडासाठी आता परदेशात राहणारेही करु शकतात मदत

१८७७ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. तेव्हापासून १९१५-१८ दरम्यानच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात ही स्पर्धा रद्द झाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. कोरोनामुळे यंदाच्या वर्षी रद्द होणारी विम्बल्डनही पहिली ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आहे. 

राष्ट्रभक्तीचं नवं फॅड, चक्क 'लॉकडाऊन' ठेवलं मुलाच नाव

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सर्वच क्रीडा क्षेत्राला या विषाणूने प्रभावित केले आहे. खेळावर पाणी फेरले आहे. जगातील मानाची स्पर्धा समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. युरोपातील अनेक लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा तसेच क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषकावरही संकटाचे सावट आहे.